Popular posts from this blog
कौन हो तुम?
हे अमेरिकेतील अज्ञात android धारका / धारिके / धाराकांनो कोण तू ? समोर ये ... चाहूल लागलीये तुझी .. इथे न भय कशाचे. न असणे अनामिक इथे गुन्हा. रहा अनामिक की हो बेपरदा - तुझाच निर्णय सर्वस्वी. पण कोणीतरी आहे हे मला कळलंय, कुतुहूल वाढतंय .. बरं चुकून थडकलेलं कोणी पुन्हापुन्हा का येईल? राग/आस्था असल्या शिवाय? येऊ नको / नका असं म्हणणं नाही .. तसं माझं काहीच म्हणणं नाही .... पण कुतूहल !!! त्याचं काय करू ? अस्वस्थ !
सध्याचं खेळणं
हे घुमतंय डोक्यात ... तसं आधी एकदा वाचलं होतं ... पण तेव्हा काहीच समजलं नव्हतं ... आत्ता झोल असाय की समजतंय असं वाटतंय .... पण grip नाही येते ... मगाशी मधेच थोडा वेळ वाटून गेलं - Euler ची "समाधी" बघायला गेलं पाहिजे .... (अश्या इच्छा आताशा येत नाहीत मनात) .... ह्यावरून अंदाज यावा "to what extent my mind must be blown by this" चा Leonhard Euler, Carl Fredrich Gauss, Newton, Galileo अश्या माणसांचे फोटो देवघरात का लावू .. चुकलं ... ह्या माणसांचे फोटो ठेवलेल्या जागेलाच देवघर म्हणावे.
Comments
Post a Comment